वासुनाना

  • 414
  • 126

वासुनाना गेले... फक्त दोन दिवस हॉस्पिटल मध्यें काढले. आणि अगदी डॉक्टरलासुद्धा प्रयत्न करायची तसदी नं देता हा निरूपद्रवी द्रव वातावरणात विरला. वासुनाना म्हणजे अंतरीक्ष सोसायटीचा प्राण बनलेले. सगळ्यांच्या चौकशा, गप्पा, अडचणीत उपाय सुचवणे आणि उपायात सहभागही घेणे. अगदी कोणाचं मूल काही वेळासाठी सांभाळायचं असू देत किंवा कोणा गृहलक्ष्मीला पेठेतून पूजेचे साहित्य वैगरे आणायला घेऊन जायचं काम असू देत. वासुनाना तत्पर. जणू त्यांनी त्यांचं म्हातारपण त्या सोसायटीसाठी चाफ्याच्या सुगंधासारखं मुक्त उधळलं. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेला हा माणूस गेली चाळीस वर्ष एकटा राहात होता. पण त्यां चाळीस वर्षातली पंचवीस वर्षे त्यांनी एकांतात कंठली आणि नंतर मात्र तो दुर्दैवाचा फेरा त्यांच्या आयुष्यातून निघाला. "प्रताप जयवन्त