थंड झाल्यार खावचा - भाग 1

  • 354
  • 87

                                                     पहिला  कोंबडा  झालाआणि  सनई  चौघडा  सुरु झाला.  तशी   आचाऱ्यांची लगबग  सुरु झाली .  जनूभटाने  मोठा  टोप भरून पाणी तापत लावले आणि  बरोबरच्या पोराना  हाकारायला लागला. “पद्या, सख्या, हऱ्या ,  भिक्या चला पट पट  आंघोळी करून घ्या   नी  रांधपाला लागा. ”  त्याचे बरोबरच  होते.  पाच गावचे  हजार दीड हजार  माणूस  लोटणार होते. वरण भात,पाच भाज्या, खीर,   जिलेबी ,  मसाले भात  , साखर भात  असा  जंगी बेत आखलेला होता.  त्यात बोंबडोजीने  बजावून सांगितलेले होते. पाच पक्वान्नांपैकी कोण काय मागेल  ते ते त्याला