थंड झाल्यार खावचा भाग ४ यंदा आंबीच्या आडव्या फाट्यावरचे आंबे बोंबड्यानेकाढून दिले. भटणीला सांगून जत्रेला विठू बरोबर बोंबड्याही आंबे विकायला गेला. तो हिशोब अगदी बिनचूक करायचा. दिलेल्या पैशाचे आंबे उज्जू मोजून द्यायचा. आठ आण्याचे , रुपयाचे आंबे घेणारं एखादं गिऱ्हाईक दोन चार आंबे वरून जादा मागायचं .... विठू द्यायला लागला तर हा त्याच्यावर खेकसून म्हणाला, “ह्यो इलो मोटो शेटयो.... चार जणांक अशे जादा दिलस काय येका चवलीचा नुकसान करशी भटणीचा.” मिळालेला गल्ला नी खपलेलेआंबे यांचॎही बरोबर ताळमेळ तो घेई. भटणीने त्याला जत्रेत खरचण्या साठी आठ आणे दिलेले. अधून मधून विठू त्याला सांगे,