प्रिय सोना ..तुझी खरेदी

  • 888
  • 255

खरेदी कोणतीही असे ती करण्यात तुला अतिशय आनंद वाटत असे कोणत्याही खरेदीत तुझा चॉईस कायम उत्तम असे माझे कपडे, साड्या बूट, पर्स, चप्पल असो वा इतर कोणतीही खरेदी असो तुझा सहभाग असायचाच तुझ्या कपड्याच्या खरेदीत मात्र तुला माझे मत लागायचेच तुझा चॉईस उत्तम असून सुद्धा..अगदी बूट,रुमाल, चप्पल खरेदी साठी सुद्धा तुला माझा चॉईस हवा असायचा कपड्यांचे रंग,पोत, क्वालिटी, त्याची स्टाईल, फॅशन सगळ काही तू पसंत करायचाऍमेझॉन वर खरेदी करताना कपड्याचे वर्णन त्याचा पोत यासंबंधी तू बारकाईने वाचायचा दर वर्षी आपल्या कुलदेवी साठी साडी घेतली की त्यातला आणखी एक रंग मला पसंत करायला सांगून तू ती माझ्यासाठी खरेदी करायचा मी नवीन फॅशनचे कपडे घातलेलं तुला खूप आवडायचं वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट,