जया व तारी - भाग ०४वैद्यबुवानी नाडी परीक्षा केली. मग ते म्हणाले की, मुलगा मंद बुद्धी आहे. मेद फार वाढलेला आहे. मी उपचार करतो पण शंभर टक्के गुण येईल याची शाश्वती नाही देता यायची. आता आहे त्यापेक्षा खूप सुढारणा होईल एवढे मात्र नक्की. असे निदान करून त्याच्या खाण्यापिण्याचे कोष्टकच वैद्यानी करून दिले. तसेच सकाळ संध्याकाळ चलन वलन होण्यासाठी काय काय हालचाली करून घ्यायच्या तेही समजावून सांगितले. दोन वर्षे नेमाने वैद्यबुवानी आखून दिल्याप्रमाणे कार्यवाही केल्यावर मात्र येशा हिंडाफिरायला लागला. बोलताना मात्र तो लागे..... काही काही शब्द तो असे उच्चारी की तो काय गल गल करतोहे त्याचा उलट होईना. कोणीतरी तो मुंज केल्यावर