१. सादिमच्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या-वाईट घटनांना वाचून त्यांना पुन्हा एकदा शब्दांच्या माध्यमातून बघण्याचा एक निष्फळ प्रयत्न करून तरी पाहू, असं उगीच वाटून गेलं. म्हणून मी तिची आकाशी वही -डायरी खाली काढली. २०१४ ते २०१५ ह्या वर्षात तिने एका वाढदिवसापासून दुसऱ्या वाढदिवसापर्यंत केलेला प्रवास त्या वही मध्ये होता. तिचा तो प्रवास पुन्हा अनुभवायला, किंवा अनुभवण्याचा निष्फळ प्रयत्न करायला मी निघाले होते. तिची ती आकाशी वही मी घाईत वाचणार नव्हते, निर्णायक होऊन तर अजिबातच नाही. कारण काहीही करून मला त्या कोऱ्या पानावर सादिमच्या उमटलेल्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. म्हणून आकाशी वहीतल्या त्या सगळ्या गोष्टी शांतपणे घिसडघाई न