जया देव तारी - भाग 5

  • 216
  • 1
  • 87

जया देव तारी - भाग ५प्रतिवार्षिक  रिवाजा प्रमाणे पुराण संपले आणि  ‘पार्वतीपते हर हर महादेव’ असा उद्घोष करीत जोशीबुवानी  मानकरी दात्यांकडे कटाक्ष टाकला. दात्यानी शंभू  देसायांकडे  मोहरा वळवून त्याना खूण केली. इशारा ओळखून देसाई उठले. त्यानी बुक्क्याचे ताम्हन उचलले. गाभाऱ्याच्या दिशेने बुक्क्याची चिमूट उधळून ते जोशीबुवांच्या समोर गेले. चिंतू जोशी  म्हणजे हळयातले ‘किटाळ’ म्हणून ओळखले जात. गावात  तंटा बखेडा झाला नी न्यायसभा भरली तर दात्ये, म्हाजन  यांच्या बरोबरीने पंच म्हणून  चिंतूकाका जोशी , माधवराव  दांडेकर आणि  विठू घाडी  या तीन असामीना   बोलावायचा रिवाज होता.                शंभू ताम्हन घेवून जोशीबुवांच्या समोर उभा राहिल्यावर त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष