भाग एक आशीर्वाद बंगला नंबर १० . शहरातल्या एका उच्चभ्रू वस्तीत दिमाखात उभा असलेला हा एक मोठा प्रशस्त बंगला. बंगल्याची भव्यता, त्याची देखणी रचना आणि समोरची सुंदर बाग. त्याला बघून च कल्पना येते की हा कुठल्या मोठ्या बिझनेस मॅन चा किंवा तत्सम व्यक्ती चा बंगला असावा , आणि तो होता ही त्या शहरातील मोठ्या बिझनेस मॅन श्री अजित नाईक ह्यांचा बंगला .या बंगल्यात श्री अजित नाईक त्यांच्या पत्नी सौ अर्चना नाईक आणि त्यांची मुलगी अनघा नाईक रहात असत . अनघा लहान असताना तिला सांभाळायला म्हणून गावाकडून अजित रावांची लांब ची बहीण जी खूप कमी वयात विधवा झाली होती आणि समाजात आणि नात्यात