अविवाहित आई - 2

  • 1.4k
  • 675

भाग दोन अनघा सध्या रिकामीच होती , कॉलेजची फायनल इयरची परीक्षा नुकतीच संपली होती. पेपर्स तर खूप छान गेले होते, पण आता रिझल्ट यायला अजून महिना-दीड महिन्याचा कालावधी बाकी होता. तोपर्यंत घरात बसून करायचं काय? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. रोजचा तोच तोच दिनक्रम आणि तोच कंटाळवाणा वेळेचा प्रवास! शेवटी या रिकाम्या वेळेचा काहीतरी चांगला उपयोग करावा आणि मस्त एन्जॉय करावं . म्हणून अनघा आणि तिच्या मित्र मैत्रिणी ने फिरायला जायचं ठरवलं होतं . आज ती अमोल ला भेटून याच संदर्भात बोलणार होती . सगळ्यांची संमती झाली होती, पण ग्रुपमधला महत्त्वाचा दुवा असलेला अमोल अजून या बेतात सामील झाला नव्हता. तो सध्या