पडद्याआडचे सूत्रधार - 7 - शोधकार्य समाप्ती आणि पृथ्वीवर बस्तान

  • 2k
  • 714

ब्ल्यू बॉक्स घेऊन एक गाडी MS 2 मध्ये आली. MS 2 मध्ये त्याचे विश्लेषण करण्यात आले. उच्च तंत्रज्ञानाने त्यांनी सगळे विश्लेषण केले तर त्यांना असे आढळले की या तबकडीमध्ये चंद्रावरून त्याच्या पृष्ठभागावावरून आणलेली माती, दगड, खडक आहेत. तबकडी कोसळण्याच्या आधी ते सगळे घेऊन हे सर्वजण झीरो चेंबर मध्ये बसले होते.तेवढ्यात MS 2 मध्ये संदेश आला की झीरो चेंबर सापडला आहे पण त्याचे तुकडे झाले आहेत आणि शास्त्रज्ञांचे शरीराचे अवशेष सापडले आहेत. त्यांनी लगेच लोकेशन पाठवले. उरलेल्या सर्व शोध घेणाऱ्या गाड्या त्या लोकेशनकडे वळवल्या गेल्या. इकडे मिळालेल्या ब्ल्यू बॉक्सचे विश्लेषण सुरू असताना एक गोष्ट कळली की झीरो चेंबरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन