प्रकरण २मधे किती काळ गेला कोणास ठाऊक, वज्रला आता अस्पष्ट असा आवाज यायला लागला होता. शब्द कळत नव्हते.एखाद्या मैलभर लांबीच्या बोगद्याच्या पलीकडच्या टोकापासून हे आवाज आल्याचा भास होत होता. त्याचे डोळे आता अर्धवट उघडायला लागले होतं.आपल्या अवती भोवती काही माणसं जमल्येत आणि आपल्यावर ओणवी होऊन बघताहेत अशी जाणीव वज्रला झाली. बहुदा उपचार करणारे डॉक्टर असावेत.“ अगदी थोडक्यात वाचला हा.” एक आवाज.“ याला फार लागलं नसेल तर घेऊ का याला उभा आडवा?” दुसरा आवाज.“ घाई नको करू.अजून थोडा जरी डाव्या बाजूला पडला असता तरी मेला असता हा.” पहिला आवाज.“ त्याला मी ताब्यात घेतला की मेलो असतो तर बर झालं असतं असं