प्रकरण ४कोलाघाट ला आल्या नंतर बंगली भाषेतली एक भली मोठी पाटी वज्रला पाहायला मिळाली.त्याचा अर्थ काय म्हणून वज्रने विचारलं, पलाश ने त्याचा अर्थ सांगितला, त्या नुसार जरा विसावा असं त्या धाब्याचं नाव होतं.हा शेवटचा धाबा आहे, इथे तुमच्या आणि वाहनाच्या खाण्या पिण्याची सोय आहे.पुढे दीडशे किमी पंप किंवा हॉटेल नाही.असा मजकूर होता.एका बाजूला वळण घेऊन घाट रस्ता जात होता आणि उजव्या बाजूला दरीच्या काठाला खूप मोठा प्लॉट होता त्यावर पंप, सर्व्हिस स्टेशन, एक बऱ्यापैकी मोठं आणि अतिशय स्वच्छ रेस्टॉरंट, त्यामागे बंगला, आउट हाउस, आणि त्या सगळ्याच्या मागे असलेल्या खूप मोकळ्या जागेत भंगार माल ठेवायची जागा.पलाश ने ट्रक थांबवला आणि गेट उघडण्यासाठी हॉर्न