विलक्षण २येताना माझं विचार चक्र चालू होतं.त्या गुराख्याने त्या जागेच्या मूळ मालकाचे नाव "कोटणीस" सांगितले होते.मला जे कागद पुजारेंनी दिले होते त्यात सुध्दा " कोटणीस नावाचा उल्लेख होता.या नावाभोवती गूढ वलय तयार झाले होते. आता पुन्हा एकदा ते कागद चाळले पाहिजेत असं मी ठरवले.मी बंगल्यावर आलो.पोलीस स्टेशनमधून घेतलेल्या नंबरवर मी फोन केले.अपेक्षेप्रमाणे मला सुरुवातीला माहिती मिळवताना अडचण आली.पण मी इतिहास संशोधक आहे व सरदार कोटणीस यांच्याशी निगडित असलेल्या कोटणीसांची माहिती गोळा करतोय असं सांगितल्यावर मला काही माहिती मिळाली.ही माहिती खूपच महत्त्वाची होती. अपघात झालेले तिन्ही कोटणीस या ना त्या प्रकारे सरदार कोटणीस यांच्या खानदानाशी संबंधित होते. पण ते एकदोन पिढ्यांपूर्वी