# मी हे का लिहिते...कारण माझ्या जवळचे ह्या दुःखात होरपळू नयेत...मी अगदी लहान असताना आई नसल्याचे दुःख किती आणि काय असते हे फील केले, जरी मला माझी आई आहे. पण समोरच्यांचं दुःख माझं का बनतं, हेच मला समजत नाही.माझी एक मैत्रीण... अगदी मी आणि ती पहिलीत असतानापासून आम्ही सोबत होतो. तिला आई नव्हती आणि तिचं दुःख कसं दूर करू, यासाठी माझं मन जळत असायचं, अजूनही जळतं. तिला म्हणायचीही, "माझी आई ती तुझी आई." पण एवढं सोपं नसतं ते. मी तिला माझ्या घरी नेऊन ठेवू शकत नव्हते, की "तू माझ्याच घरी राहा."माझी आई खूप छान आहे. अगदी आजही सर्वांवर खूप जीव