पेरणी कादंबरी भाग २ लोकं शिक्षण घेत. उच्चशिक्षीत होत. परंतु ते धर्म, परंपरा व अंधश्रद्धा यात गुरफटत असत. त्याचा परिणाम श्यामलवर होवू लागला होता. त्यामुळंच ती म्हणत असे की याबाबतीत काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. धर्म, परंपरा व अंधश्रद्धा या दोन गोष्टी. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. धर्म हा संस्कारावर अवलंबून असतो. तशीच परंपरा व अंधश्रद्धाही संस्कारावर अवलंबून असते. संस्कार हे लहाणपणीच होत असतात. ते संस्कार कधी आईवडिलांमार्फत तर कधी शेजाऱ्यांमार्फत तर कधी मित्र मैत्रिणीमार्फत तर कधी संस्कारी पुस्तकांचं वाचन करुन, व्हिडिओ पाहून होत असतात. संस्कार