**दगडाच्या देवाला सजवण्यापेक्षा विचारांना सजवा...**दगडाच्या देवाला, मूर्तीला, फोटोंना सजवण्यापेक्षा विचारांना सजवा. आपण जेव्हा मूर्ती सजवतो, देवाला हार-फुले अर्पण करतो, तेव्हा नेमकं काय शोधत असतो? आपल्या कर्मांची भीती? की जे होणार आहे त्याला सामोरं जाण्याची हिंमत आपल्यात नाही?जर देव आहेच, तर त्याचं अस्तित्व फक्त त्या फोटोपुरतं आहे का? त्या मंदिरापुरतं आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.आपण सतत नामस्मरण करतो, देव-देव करतो; पण जेव्हा एखाद्या गरजू माणसाला मदतीची गरज असते, जेव्हा सत्याची बाजू घ्यायची वेळ येते, तेव्हा पुन्हा जप-जप सुरू होतो. ही श्रद्धा नसून अनेकदा हुशार माणसाची लाचारी असते.वाईट घटना घडली की प्रश्न त्या दगडाला विचारतो — "असं का झालं?"