टाईम पॅराडॉक्स - 4

अध्याय ४----------------शून्य----------अंधार इतका गडद होता की सागरला स्वतःचे हातही दिसत नव्हते.फक्त एक आवाज ऐकू येत होता — सानवीचा श्वास, जलद आणि अनियमित. आणि त्याहून भयाण — एक हलकासा, यांत्रिक आवाज. जणू कुठेतरी एक घड्याळ उलट्या दिशेने टिकटिक करत होते."हलू नकोस," सानवी कुजबुजली, इतक्या जवळून की सागरला तिचा श्वास जाणवला. "आवाज करू नकोस. तो अंधारात चांगला 'दिसतो'.""कोण आहे 'तो'?" सागरने तितक्याच हळू आवाजात विचारले...."शून्य."ते नाव — फक्त एक शब्द — पण त्या शब्दात इतकी भीती सामावलेली होती की सागरच्या अंगावर सरसरून काटा आला."शून्य?" सागरने पुन्हा विचारले. "हे... हे काय नाव आहे?""नाव नाही," सानवी म्हणाली. "पद आहे. किंवा... अवस्था. तो माणूस नाही,