टाईम पॅराडॉक्स - 12

अध्याय १२------------------आर्किटेक्ट्स------------------"कारण अपघातानंतर — त्याच रात्री — मला 'त्यांनी' घेऊन गेलं," ती म्हणाली."त्यांनी....? त्यांनी कोणी सानवी?" सागर ने स्वतःला सावरत विचारले."आर्किटेक्टस" सानवी ने धीर धरून सांगितले."आर्किटेक्ट्स?" सागरने पुनरुच्चार केला, शब्द जणू तोंडात विरघळतच नव्हते.सानवीने मान डोलावली. तिने आपल्या मनगटावरच्या त्या चंदेरी ब्रेसलेटकडे पाहिले, मग सागरकडे."त्या रात्री, अपघात टळल्यावर," ती म्हणाली, "आपण घरी पोहोचलो. सगळे ठीक होतो. पण मध्यरात्री, मला झोप येत नव्हती. मी बाहेर अंगणात गेले — आणि तिथे एक प्रकाश दिसला. तुझ्या तळघरातून येणाऱ्या प्रकाशासारखाच. पण तो वेगळा होता — जुना, थकलेला, जणू वर्षानुवर्षं तिथे होता.""आणि?""आणि तिथे एक माणूस उभा होता. म्हातारा. त्याने मला सांगितलं की तो... तो माझ्या