तिजोरी - प्रकरण 9

  • 360
  • 177

प्रकरण ९सकाळी सहा वाजेपर्यंत सांझी तिथेच होती.ही आपल्याला गुंडाळायचा प्रयत्न करत असेल तर ते आपण होऊन द्यायचं नाही. वज्रने मनाशी निश्चय केला. सकाळी सात- सव्वा सात वाजता वज्र उठला. आपले प्रातर्विधी आटोपून तो किचन कडे जायला निघाला. आज शिरताच त्याला आम्लेटचा खमंग वास आला. कालच्या प्रसंगा नंतर सांझी नेमकी काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज वज्र करू लागला. त्याची अपेक्षा होती की नेहमीप्रमाणे किचनचं दार तिने बंद केलं असेल परंतू ते उघडच होतं. आत मध्ये सांझी आम्लेट करत होती. त्याला बघताच ती मागे वळली. त्याच्या गळ्यात आपले हात टाकून तिने विचारलं,“काल रात्री जे घडलं त्याबद्दल काही पश्चात्ताप वाटतोय?”“नाही.” वज्र म्हणाला. क्षणभर