प्रकरण १२“मी खरेदीसाठी हल्दियाला जाणारे तुमच्या दोघांपैकी कोणी माझ्या बरोबर येणारे?” दुसऱ्या दिवशी सकाळी सांझीने जाहीर केलं आणि कपडे बदलायला आत गेली.वज्र ची वाट न बघता अथांग ने तिला तो येणार असल्याचं सांगून टाकलं. तो इथे राहायला आल्यापासून बाहेरच पडला नव्हता, त्यामुळे त्याला कंटाळा आला होता, शिवाय त्याला बारीक सारिक खरेदीही करायची होती.सांझीने आत जाता जाता त्यावर असा काही चेहेरा केला की तिला वज्र पेक्षा अथांग बरोबर जाण्यातच रस होता.वज्रने अथांगला तिच्या बद्दल सावध केलं. तुम्ही दोन तीन तास बरोबर असणार आहात, ती तुला गुंडाळू शकतं म्हणून स्पष्ट सांगितलं पण अथांग ने त्याला खात्री दिली की तीच नाही तर कुठलीच