विलक्षण भाग ९ माझ्या मनातले प्रश्न मी गौरीला विचारले.गौरी काही क्षण गप्प राहिली.मी थोडा अस्वस्थ झालो.काही वेळाने गौरी म्हणाली..." मी मुक्त का नाही झाले हे मला नाही सांगता येणार.पण आता मला कुणाचा सूड घ्यायचा नाही किंवा माझी कोणतीही इच्छा अपूर्ण नाही.विश्वंभरच्या मृत्यू नंतर दुर्गा आणि भामिनी ने सगळा कारभार आपल्या हाती घेतला.लोकांच्या ज्या जमिनी विश्वंभरने बळकावल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी परत केल्या.गावातले देऊळ नव्याने बांधून घेतले.शेतक-यांसाठी एक तलाव बांधला.जी मामींनी नवरा असताना अबोल झाली होती ती आता प्रमेय होऊन नोकरां-चाकरांची लेकरांप्रमाणे काळजी घेत होती.ज्या कोटणीसांच्या घराण्याबद्दल पंचक्रोशीत दहशत होतीत्या ऐवजी आता आदराची भावना निर्माण झाली होती.घराण्याला वारस नव्हता.त्यामुळे विश्वंभर ची कागल