डोंबिवली फास्ट: कोड ६० - 7

"दोन्ही हात वर कर अभिमन्यू! आता तुझ्याकडे पळायला एक इंचही जागा नाही!" सायबर सेलच्या त्या कडक मिशांच्या अधिकाऱ्याचा आवाज अरबी समुद्राच्या लाटांपेक्षाही जास्त गर्जला. ५-६ पोलिसांच्या पिस्तुलाच्या नळ्या थेट अभिमन्यूच्या दिशेने रोखलेल्या होत्या. जेटीवरील पर्यटकांची पळापळ झाली होती आणि संपूर्ण परिसरात एक भयानक शांतता पसरली होती. अभिमन्यूच्या पाठीमागे फक्त अथांग, खोल समुद्र होता आणि समोर पोलीस. पण त्याच्या मनाला पोलिसांच्या पिस्तुलापेक्षा त्या लाल डायरीच्या ६० व्या पानावर लिहिलेल्या नावाने जास्त जखमी केले होते. त्या पानावर स्पष्ट अक्षरात लिहिले होते— 'अमित शर्मा / सायबर सेक्युरिटी हेड'. अमित शर्मा! हा दुसरा कोणी नसून अभिमन्यूच्याच ऑफिसमधील त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि कंपनीचा सायबर