नियती पुन्हा हाक देईपर्यंत.. - 3

Chapter 3 – नव्या दिवसाची सुरुवातरात्रभर त्या फोटोचा विचार मनातून जात नव्हता.सकाळी गजर वाजला तेव्हा डोळे उघडले, पण मन अजूनही कालच्या आठवणीत अडकून पडलं होतं. मी मोबाईल हातात घेतला आणि पुन्हा एकदा तोच फोटो उघडला. काल ज्या चेहऱ्याने माझ्या मनात आशेची एक छोटीशी ठिणगी पेटवली होती, आज तो चेहरा तितकाच धूसर वाटत होता.मी काही क्षण स्वतःकडेच पाहत राहिले."तारा... किती दिवस अजून असंच?"मनाने लगेच उत्तर दिलं—"जोपर्यंत नियतीचं उत्तर मिळत नाही... तोपर्यंत."मी हलकंसं हसले.कधी कधी स्वतःशी बोलणंही किती गरजेचं असतं.ते आपल्याला तुटू देत नाही.आईने नेहमीप्रमाणे डबा हातात दिला."आज खूप शांत दिसतेयस.""काही नाही गं... फक्त थोडा थकवा आहे."मी सहज उत्तर दिलं.खरं तर थकवा