देवाचे ठाणे ५ मी इन्स्पेक्टरची परवानगी घेतली व रुम वर परतलो.आंघोळ करून मी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बेडवर पहुडलो.काही काळ डोळे बंद करून तसाच राहिलो.अर्धा तास मी नुसता पडून होतो.मला झोपायच होत पण झोप येत नव्हती.काल रात्रीची घटना डोळ्यासमोर सारखीफिरत होती. मी उठून ' धर्मानंद वर्मा ' माहिती मिळवायला सुरुवात केली.मोबाईलवर सर्च केल्यावर सुमारे सहा धर्मानंदवर्मा दिसले.मला हवा असलेला धर्मानंद वर्मा त्यातच होता.दिल्लीत केंद्रीय मंत्रालयात सचिव म्हणून त्याने तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केले होते.त्याचे अनेक मंत्र्या सोबत व खासदारां सोबत मैत्रीचे व अर्थपूर्ण संबंध होते.निवृत्त झाल्यावर त्याच लक्ष कोकणातील जमीनींकडे गेले.त्यानेकोकणातल्या किना-या लगतच्या जमीनी खरेदी करायला सुरुवात केली.तो अत्यंत अधाशी व