नियती पुन्हा हाक देईपर्यंत.. - 11

  • 366
  • 78

Chapter 11 – शब्दांना मिळालेली ओळखकाही दिवस शांतपणे निघून गेले.तारा नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होती.काम, घर, डायरी...तिचं आयुष्य पुन्हा एका ठरलेल्या लयीत आलं होतं.पण तिच्या मनात एक नवी गोष्ट जन्माला आली होती—लेखन.तिला आधी वाटायचं, मनातलं सगळं लिहिणं म्हणजे फक्त स्वतःशी बोलणं.पण आता तिला जाणवत होतं...कदाचित तिच्या शब्दांना स्वतःचं आयुष्य मिळू शकतं.त्या रात्री तिने laptop उघडला.समोर रिकामी screen होती.Cursor सतत blink होत होता.तिने काही क्षण विचार केला.आणि मग पहिलं वाक्य लिहिलं—“काही लोक आपल्या आयुष्यात फक्त एकदाच येतात...”ती थांबली.पुन्हा लिहिलं—“पण त्यांच्या येण्याचा आवाज मनाला आयुष्यभर ऐकू येत राहतो.”तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं.तिला कळलं होतं...ती फक्त कथा लिहित नव्हती.ती स्वतःच्या मनाचा एक भाग शब्दांत