देवाचे ठाणे - 6

  • 207
  • 60

देवाचे ठाणे६       दश दिशातून हवा शिल्पा भोवताली ओढली जावू लागली. बघता - बघता हवेचा एक भोवरा परीसरात तयार झाला. तो भोवरा एवढा शक्तीशाली होता की सुरुंग पेरणारी माणसंही त्यात ओढली जावू लागली. माझ्या कपाळावर लावलेली गन त्या माणसाच्या हातून निसटली व त्या भोव-यात सामावली.तो गुंड सुध्दा ओढला जावू लागला.त्याने चि-याच्या दगडी कुंपणाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला.मी सहज मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली ते बंद पडले होते.पेरलेलेसगळे सुरुंग व वायर्स गरगरा सभोवताली भिरभिरु लागले.या सगळ्या गडबडीत मी व माझा तंबू जागच्या जागी होता.सभोवतालची वावटळ ही हवेच्या दाबातील फरकाने झाली नव्हती तर ती चुंबकीय क्षेत्रातील बदलामुळे निर्माण झाली होती. तो चुंबकीय