भाग - सहा हजाराचे सात हजार -विश्वासाची परीक्षा Sahaa Hajarache Saath Hajar - Vishwasachi Parikshaसहा हजार खिशात आले आणि डोक्यात हवा गेली. असं तुम्हाला वाटलं असेल. पण झालं उलटं. सहा हजार आले आणि माझी झोपच उडाली.कारण आता मला कळलं होतं, एका दुकानातून दोन हजार मिळतात. मग दहा दुकानातून वीस हजार मिळतील. हिशोब सोपा होता. पण काम सोपं नव्हतं.मी रामला रोज बोलवू लागलो. आम्ही दोघे सकाळी 9 ला निघायचो. बीडच्या सगळ्या लहान दुकानात जायचो. मी दुकानदाराला बोलायचो, राम वहीत लिहायचा. कोणत्या वेळी गर्दी आहे, काय विकलं जात नाही.एका महिन्यात आमच्याकडे सात दुकानं झाली. प्रत्येक दुकानातून महिन्याला दोन हजार. म्हणजे चौदा हजार फिक्स.