भाग ३रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. घरात आता शांतता होती. शिवांशने एकदा श्रीजाकडे पाहिलं. दिवसभर ताण सहन करून थकल्याने तिला झोप लागून गेली. एक क्षण तिच्याकडे बघून त्यालाही वाईट वाटलं. तिचीही स्वप्नं असतील. पण नवं आयुष्य सुरु करताना एक जबाबदारी आणि लादलेलं नातं तिच्या वाट्याला आलं होत. लहानही होती त्यामानाने. पण हे सगळं आणि तिला सांभाळताना त्याला मात्र मनावर दगड ठेऊन कठोर व्हावं लागत होतं. खाली येऊन तो काका काकूच्या खोलीसमोर आला. दार अर्ध लोटलेलं होतं. त्याने टकटक करून दार वाजवलं. आतून महेंद्रचा आवाज आला. "शिव ये आत.""बस."तो समोरच्या खुर्चीवर बसला. काही क्षण तिघांमध्ये शांतता होती. आज इतकं काही घडून गेलं होतं