अंतर्मन - भाग 7

  • 495
  • 186

भाग : भाऊसाहेबचा खरा चेहराप्रकाशने "सॉरी जय भाऊ" म्हटलं आणि मी त्याला माफ केलं. तो त्याच्या दुकानात परत गेला, पण माझ्या डोक्यातून एकच प्रश्न जात नव्हता.राम हा वेडा आहे, गरीब आहे, पण गद्दार नाही. तो प्रकाशचा मित्र आहे, पण तो माझा भाऊ पण आहे. तो मला धोका देईल का?त्या रात्री मी रामला घरी बोलावलं नाही, मी त्याला आमच्या जुन्या लॉजच्या टेरेसवर बोलावलं. जिथे आम्ही दोघांनी पहिलं स्वप्न बघितलं होतं.राम आला. घाबरलेला होता. त्याने तोच जुना शर्ट घातला होता.मी त्याला म्हणालो, "राम, बस."तो बसला.मी म्हणालो, "राम, तुला आठवतंय का, आपण इथे बसून म्हणायचो, एक दिवस आपली मोठी कंपनी असेल?"राम म्हणाला, "आठवतंय