अंतर्मन - भाग 8

  • 345
  • 126

भाग: सत्तर दुकानांचा सौदामी रात्रभर झोपलो नाही. अण्णा कोण असतील? ते कसे दिसत असतील? ते मला नापास करतील का?सकाळी मी पाच वाजताच उठलो. ऑफिस झाडलं. बोर्डावरचे पाचही नियम मी नव्याने लिहिले. रामला म्हणालो, "आज कोणीही काहीही बोलला तरी तोंड उघडायचं नाही. फक्त बघायचं."ठीक 10 वाजता गोडाऊनसमोर एक काळी Scorpio येऊन थांबली. त्यातून भाऊसाहेब उतरला. त्याच्या मागे एक माणूस उतरला - उंच, सावळा, डोळ्यावर काळा गॉगल, पांढरा शर्ट आणि हातात सोन्याचं घड्याळ. त्याला बघताच कळत होतं, हा माणूस पैशाने नाही, पैशावर राज्य करतो.भाऊसाहेब म्हणाला, "जय, हे माझे मोठे बंधू - अण्णा. मुंबईचे सगळे मोठे होलसेलर्स यांच्याच हाताखाली आहेत."मी हात जोडले. "नमस्कार