धैर्य

प्रस्तावना:-धैर्य हे पुस्तक जो कोणी हातात घेईल, त्याला असंच वाटेल की धैर्याबद्दल असेल हे पुस्तक किंवा एखाद्या धैर्यवान माणसाची गोष्ट असेल. हे खरंच आहे. पण धैर्याबद्दल काय सांगायचं? आजच्या इंटरनेट गुगलच्या जमान्यात कशाचीही माहिती एका मिनिटात इंटरनेटवर दिसून येते.अशाच काळात गुगलला विचारलं की धैर्य म्हणजे काय? तर लगेचच उत्तर मिळेल  -एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला निर्धार आणि त्या कार्यासाठी केलेले प्रयत्न  म्हणजे धैर्य.मंग एवढ्याशा व्याख्येसाठी हे पुस्तक वाचायची काय गरज? पण या पुस्तकात मी  धैर्याबद्दल थोडीशी वेगळीच कल्पना केली आहे. माझ्या मते, धैर्य म्हणजे फक्त एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला निर्धार नाही तर एखाद्या कार्याचा शेवट होईपर्यंत स्वतःला त्यात टिकून ठेवणं, हे सर्वात मोठं धैर्याचं