भाग ४रात्रीचे साडेबारा वाजले होते. घरात सगळीकडे शांतता होती.शर्वाणीच्या खोलीत मात्र अजूनही दिवा चालू होता. टेबलवर नोटबुक, संदर्भग्रंथ, फाईल्स आणि लॅपटॉपचा पसारा होता. तिने एकामागून एक निरीक्षणं वाचायला सुरुवात केली. काहींच्या बोलण्यात पश्चात्ताप होता.काहींच्या बोलण्यात राग.काहींच्या डोळ्यांत भिती.काहींच्या चेहऱ्यावर बिनधास्तपणा.पण सरताज...तिने त्याचं पान उघडलं....ते जवळजवळ पानच रिकामं होतं.काही निरीक्षणं. काही नोंदी. आणि उत्तरं नसलेले बरेच प्रश्न.शर्वाणी खुर्चीला टेकली. विचार करत राहिली.तो बोलत नव्हता. हे ठीक होतं.पण त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे...तो स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न करत नव्हता.स्वतःची बाजू मांडत नव्हता. स्वतःला निर्दोष म्हणत नव्हता.जसं त्याला कुणाच्याच मताशी काही देणंघेणं उरलं नव्हतं.तिने फाईल बंद केली. पण त्या रात्री झोपेपर्यंत तिच्या डोक्यातएकच प्रश्न फिरत राहिला."हा