स्टॅम्प पेपर भाग २

  • 636
  • 255

स्टॅम्प पेपर  पात्र परिचय प्रशांत.               वाड्याचा मालक विशाखा               प्रशांतची बायको. विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर जयसिंग              भाडेकरू. मल्हार         भाडेकरू. अप्पासाहेब            भाडेकरू. विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश                भाडेकरू सुधाकर               भाडेकरू    भाग  २ भाग १ वरुन पुढे वाचा........   “मला असं वाटतं की जयसिंग जे काही आत्ता बोलला, त्यावर विचार करायला हरकत नाही. आपण उद्या संध्याकाळी पुन्हा बसू. तो पर्यन्त सर्वच विचार करून ठेवा.” अप्पासाहेब म्हणाले आणि मग मीटिंग संपली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तर नाही पण रात्री पुन्हा मीटिंग भरली. जयसिंगने सुरवात केली. “तुम्हाला सर्वांना हे माहितीच असेल की आपण सर्व इथे