देवाचे ठाणे - 8

  • 558
  • 210

देवाचे ठाणे ८सुजाता आली तेव्हा साडेतीन वाजून गेले होते. रेल्वे तासभर उशीराने आली होती. प्रवासाने थकलेली व मरगळलेली सुजाता दिसेल असं मला वाटलं होत.पण ती तर खुपचं उत्साही व मोहक दिसत होती.सैरभैर झालेले केस...गोबरेगुलाबी गाल..नजरेतील मोहक अदा... ओठांवर मिस्किल हास्य. मी एकटक बघतच राहिलो." काय बघतोस?"" अं ...काहिच नाही." मी भानावर येत म्हणालो."माणसाने मनात आहे ते बोलून टाकावे." ती हसत म्हणाली. मी खांदे उडवले व तीला म्हणालो." बस. जाऊया."      मी तिला दोन दिवसात काय घडलं ते सांगितल. " खरच आज एलियन सड्यावर येणार आहेत?"" एलियन नको म्हणूस,आपल्याच सारखे पण खूप प्रगत प्राणी आहेत ते.... पूर्वी त्यांना देव असं म्हणत."" खरं