(पेपरची घडी करुन बाजूला ठेवत मनात साचलेले अनेक दिवसा पासुनचे वसुचे भविष्य सांगायला सुरवात करतो. सध्या तुमचे गृहयोगाचे सामर्थ्य बलवान असल्यासमुळे वर्षाची सुरवात निकटवर्तीयांच्या सहवासाने होइल. (सुरवातीचे वाक्य भक्करम व सध्याच्या परिस्थीतीशी मिळते जुळते ऐकल्याने तिचा विश्वास व ऐकविल्याने त्याच्यात आत्म विश्वाास वाढला.) तुमच्या राशीत नुकतेच गुरुचे नक्षत्र संपून शनीचे नक्षत्रात चंद्राचे आगमन झालेले आहे त्याामुळे यापुढे तूमच्याा डोके दुखीची तक्रार रहाणार नाही. त्यातमुळे डोक्याला गच्च कपडा बांधुन अवेळी झोपण्याचे सोंग टळेल. नवीन वर्षात खरदिला आवर घालावा लागेल. त्याातल्या् त्यात स्वत: करिता वस्त्र (साडी), धातू (सोने) च्या खरेदिपासून दूर रहा. प्रवास टाळा, घरी कामात जास्त लक्ष द्या. गुरु, बुध लाभदायक आहेत जर रोजची कामे वेळीच केली व कामातल्या वस्तु, वेळीच आवरल्यास तर. उदा. भाजी चिरल्या नंतर किंवा निसल्या नंतर भाजीचा कचरा ताबडतोब उचलुन टाका. चहात साखर, पत्ती टाकल्या नंतर डबे परत जागेवर ठेवा. गॅसवर दुध ठेवून टिव्ही पहात बसु नका. नळाला पाण्यााचे भांडे लावुन शेजारणीशी बोलत बसु नका. रवी हा ग्रह अनुकुल राहील जर बाहेरुन आल्या नंतर बदललेल्याा साडीची घडी करुन ताबडतोब आलमारीत ठेवली तर. मंगळ वक्रि असल्याने सकाळी पतीच्या् किमान एक घंटा आधी झोपेतुन उठल्यास पुढचे आयुष्य आनंदाचे जाइल.