कॉलगर्ल

(520)
  • 509.8k
  • 350
  • 303.2k

टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला नव्हता. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा

Full Novel

1

कॉलगर्ल - भाग 1

टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला नव्हता. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा ...Read More

2

कॉलगर्ल - भाग 2

ठीक ठीक म्हणत यश पुढच्या कामाला लागला. लॉन्चर समुद्रात निघाली. समुद्राच्या लाटा बोटीला धडकत. त्यामुळे बोट हळूच डूचमळे. समुदपक्षी खाण्यास समुद्रावर घिरट्या मारत असत. हिरवी गर्द झाडी, ओळीत नारळाची झाडे, निळाशार समुद्र, मोठे नयनरम्य दृश्य होते. लॉन्चर पाणी कापीत समुद्रात शिरली. अंतर कापीत साईटवर आली. “चला सायबानु, sample घ्यायचा ना?” बबनच्या बोलण्याने यश भानावर आला. त्याच्या डोक्यातून हडळ अन केसांच्या पुंजक्याचा विषय जात नव्हता. दिवसभर तो त्याच तंद्रीत होता. फोरेस्ट ऑफिसरने ही फोनवर या गोष्टीला दुजोरा दिला. तसेच अशा घटनेमुळे दोन कर्मचार्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. आणि काळजी घ्यायचा सल्ला दिला. बबनच्या बोलण्यात तथ्य होतं. यशला आता त्या रस्त्यानं ...Read More

3

कॉलगर्ल - भाग 3

शेवटी अजय अन यशने तिला ओढतच काउचवर आणले. लिंबू पाणी पाजल्यावर ती जरा शुद्धीवर आली. यशच्या हातात रेडबुलचा टीन ती वैतागली. “यार यश, मी मुलगी असून रम पिते. आणि तू रेडबुल पितोस. शी...!!! मला तुझी लाज वाटते यार. रेडबुल फेकून दे, ही बिअर पी, करोना आहे यार.......इसके लिये तुम होस्टेलपे झगडते थे.” “नको यार अनु... रात्री आईशी स्काईपवर बोलायचं आहे. प्लीज आज नको.” यार एक ग्लास बिअर......अपने भाभीकी respect के लिये इतना भी नही करेगा?” असं म्हणत ती उठायला गेली अन धडपडली. तिच्या आग्रहामुळे यशने एक ग्लास बिअर पिली. “सिगरेट नही पियेगा........अपनी भाभीकी हातसे.........एक कश एक कश म्हणत तिने ...Read More

4

कॉलगर्ल - भाग 4

प्लान तर fantastic च होता. यशला त्यामुळे हुरूप आला. आशेचा नवा किरण दिसू लागला. “अनु प्लान तर excellant आहे माझ्यासोबत राहायला कोण येईल?” “ते तू माझ्यावर सोड रे, फक्त पैसा खर्च करायची तयारी ठेव.” “हा जॉब वाचवण्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार आहे.” “but are you OK with this?” “I am Ready. पण अनु मी काय म्हणतो, तूच का येत नाहीस माझ्यासोबत?” हे ऐकून अजय वैतागला. “अरे तुझ्या जिभेला काही हाड? आम्ही तुझं घर बसवायचा प्लान करतोय, अन तू माझाच संसार उठवायला निघालास. आणि काय रे वाहिनी ही आईसमान असते ना? अन तू चक्क अनुला बायको म्हणून घेऊन ...Read More

5

कॉलगर्ल - भाग 5

दुसऱ्या दिवशी आयरिश हाऊसमध्ये यश पुन्हा जेनीसमोर बसला होता. ती आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. “I am sorry मी काल तुला एकटीला सोडून गेलो, actually मी काल थोडा disturb होतो.” “इट्स ओके, नो प्रोब्लेम.” “काल तू तुझ्या conditions सांगत होतीस?” “अं? actually माझी एकच condition होती. तुमच्या काही conditions असतील तर प्लीज?.....” “नाही, माझी काहीच अट नाहीये.” “तर मग आपण ही डील फायनल समजूया का?” अनुने विचारलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहून माना डोलावल्या. “cheers for this cute couple.” म्हणत अजयने वाइनचा ग्लास उंचावला. तिघांनीही त्याला response दिला. “यश, माझी तुम्हाला एक request होती. काल तुम्ही मला जसं सोडून गेलात, ...Read More

6

कॉलगर्ल - भाग 6

सकाळी यश उठला तेव्हा त्याचं अंग दुखत होतं. रात्रभर सोफ्यावर झोपल्याचा परिणाम होता. पण आता याची सवय करून घ्यायला होती. रत्नागिरीहून अप डाऊन करण्यापेक्षा हे better होतं. त्याने बेडरुममध्ये डोकावून पाहिलं. बहुदा जेनी बाथरूम मध्ये होती. त्याने दोघांसाठी चहा टाकला. “गुड मॉर्निंग! कशी झाली झोप?” “खूप छान झाली. ‘आपलं’ घरही मस्त आहे. मला खूप आवडलं.” ‘आपलं?’ यशला तिच्या बोलण्याचं हसू आलं. पण बायकांचं असंच असतं. ‘एकदा ठरवलं ना, की त्या कोणतीही गोष्ट आपलीशी करू शकतात.’ “बस ना. चहा घे.” यश तिच्या समोर कप ठेवत म्हणाला. “बरेच दिवस सुट्टी घेतल्याने माझ्यासमोर कामाचा डोंगर पडला आहे. त्यामुळे मला साईटवर लवकर जावं ...Read More

7

कॉलगर्ल - भाग 7

सकाळी यश उठला तेव्हा जेनी शेजारी नव्हती. तो बाहेर हॉलमध्ये आला तेव्हा त्याला खमंग उपीटाचा वास आला. किचनमध्ये जेनीने तयार केला होता. “काय सकाळी सकाळी छंद जोपासायला सुरवात झाली वाटतं तुझी.” यावर जेनी गोड हसली. “तसं नाही काही, काल बबनदादांसोबत बाजारात गेले होते तेव्हा थोडा रवा घेतला होता. त्याचंच उपीट केलंय. सांगा कसं झालंय?” “क्या बात है. जेनी यार, उपीट तर झक्कास झालंय.” एवढ्यात दाराची कडी वाजवत गोगटे काकू आल्या. “काय नाश्ता चालूये का जोडीचा?” “या काकू तुम्ही पण या नाश्त्याला.” “मी ही आत्त्ताच केला गो. तुमच्यासाठी हे पोहे आणले होते.” जेनीने काकूंना उपिटाची प्लेट दिली. “छान झालंय गो ...Read More

8

कॉलगर्ल - भाग 8

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यानं यशला उशिराच जाग आली. त्यानं घड्याळात बघितलं तेव्हा काटा दहावर आला होता. पण त्याला बेडवरून इच्छा होत नव्हती. त्याने पुन्हा डोक्यावरून ब्लांकेट ओढली. “यश, दहा वाजतायेत, आज दिवसभर झोपायचा प्लान आहे का?” जान्हवी बेडरूममध्ये येत म्हणाली. यशच्या डोक्यावरचं ब्लांकेट तिने ओढलं. “’जानु’ यार, झोपू देना थोड्यावेळ. फारच थकल्यासारखं वाटतंय.” ‘जानु?’ यशमध्ये एका रात्रीत झालेला बदल तिच्या लक्षात आला. “तुला थकल्यासारखं वाटतंय?” “हं. tired but satisfied. तुला कसं वाटतंय?” जान्हवी फक्त हसली. यशने हात पकडून तिला जवळ ओढलं. “सांग ना जानु, कसं वाटतंय?” “सोड मला. खूप कामं आहेत. आणि तुही उठ लवकर.” “तू उत्तर दिल्याशिवाय मी ...Read More

9

कॉलगर्ल - भाग 9

सकाळी यश उठला. नेहमीप्रमाणे त्यानं किचनमध्ये पाहिलं. पण जान्हवी तेथे नव्हती, कुठे गेली असेल सकाळी सकाळी? बहुतेक गोगटे काकूंकडे असेल म्हणून यश बाहेर आला. समोरचे दृश्य पाहून त्याला हसू आवरलं नाही. साडी नेसलेली जान्हवी, तुळशीसमोर पूजेचं ताट घेऊन उभी होती. तिने तुळशी वृन्दावनातील वाळलेली पाने बाजूला केली. तुळशीला स्नान घातले, तिला हळद कुंकू वाहिले. समोर उदबत्ती लावली. दिवा ओवाळला. पाच प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार केला. यश दारातच उभा होता. तो अजूनही हसतच होता. “यश, का हासतोयेस?” “हे आत्ता तुझं काय चाललं होतं?” “काय म्हणजे? तुळशीला पाणी घालत होते.” “का?” “गोगटे काकू म्हणतात, तुळस सासुरवाशीणीची पाठराखीण असते. ती तिच्यावर कायम ...Read More

10

कॉलगर्ल - भाग 10

यश आज सकाळी लवकरच साईटवर आला. पुढच्या आठवड्यात कंपनीचे मँनेजर आणि भारत सरकारचे काही अधिकारी साइटला व्हिजीट देणार होते. तयारी चालू होती. यश समुद्रात सँम्पल आणण्यासाठी आला होता. अनेक सँम्पल्स घ्यायचे असल्याने त्याला बराच वेळ लागला. यश परत किनाऱ्यावर आला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. तो केबिनमध्ये जाणार एवढ्यात त्याला बबन पळत येताना दिसला. तो ओरडतच येत होता. “काय झालं बबन? एवढी धावपळ कसली चालू आहे?” “सायबानु, घात झालाय, गोगटे काकूंना नाग डसलाय. बाईसाहेबांनी त्यांना गाडीत घालून रत्नागिरीची वाट धरली हाय. तुम्हाला बी बोलावलंय, तुमचा फोन बंद हाय का?” “मी आत साईटवर होतो, आत्ताच आलोय, चल बस जिप्सीमध्ये.” यशने ...Read More

11

कॉलगर्ल - भाग 11

सकाळी डॉक्टरांनी काका-काकूंना discharge दिला. यश त्या सगळ्यांना घरी सोडून साईटवर गेला. बाकीची सगळी जबाबदारी जान्हवीनं सांभाळली. काका-काकूंची जेवणं, औषधे, सगळं काम तिने काळजीपूर्वक केलं. काकूंना जान्हवीचा मोठा आधार होता. त्यांच्या तोंडात सारखं जान्हवीचं नाव होतं. यशने रात्री काका –काकुंचं त्यांच्या मुलाशी स्काईपवर बोलणं करून दिलं. काकूंनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो आधी घाबरला, लगेच निघतो म्हणाला. पण यशने त्याला समजावलं. काकू ठीक असल्याचं सांगितलं. त्यानेही यशचे वारंवार आभार मानले.रात्री झोपताना यशने जान्हवीला जवळ घेतलं, तिचा हात हातात घेत म्हणाला, “आज किती काम केलंस, थकली असशील?”“हो. पण काकू सुखरूप आल्या याचं समाधान जास्त आहे.”“किती हिम्मत आहे तुझ्यात, तुला ...Read More

12

कॉलगर्ल - भाग 12 - अंतिम भाग

भाग 12 'कॉलगर्ल' या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. 'कॉलगर्ल ' ही माझी कादंबरी नुकतीच kindle amezon प्रकाशित झाली आहे. Publisher आणि kindle amezon सोबत असलेल्या कायदेशीर करारामुळे मला पुढील भाग अपलोड करण्यास मर्यादा येत आहेत. आपणांस होत असलेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे. kindle amezon या अँप वर संपूर्ण कादंबरी उपलब्ध आहे. कादंबरीचा पुढील भाग हृदयस्पर्शी आणि उत्कंठावर्धक आहे. आपण कादंबरी वाचून प्रतिक्रिया द्याल अशी आशा करतो. कॉलगर्ल डाउनलोड करण्याचा मार्ग ?? 1) मोबाईलमध्ये google playstore वर जाऊन kindle amezon अँप डाउनलोड करा. 2)अँपमध्ये login करा. 3)callgirl (marathi edition) सर्च करा. 4) buy now या option वरून ...Read More