डीकीतला सस्पेन्स

(16)
  • 28.9k
  • 3
  • 14.1k

रात्रीचे अकरा वाजले होते. लातूर सोलापूर मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा काळ होता, आणि एका लाल रंगाच्या कार मध्ये कॅश घेऊन चालले आहेत अशी खबर होती. आता पर्यन्त पांच कार चेक करून झाल्या होत्या. रहदारी चालूच होती पण लाल कार नव्हती त्यामुळे पोलिस जरा आळसावून बसले होते. अशातच एक लाल कार येतांना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. “साहेब, कार चेक करायची आहे. आपण जरा बाहेर येता का ?” – पोलिस. “का काय झालं ?” दिनेश ने विचारलं. “चेकिंग होऊ द्या मग सांगतो आम्ही.” – पोलिस. “ओके. करा चेक.” – दिनेश म्हणाला आणि गाडीतून खाली उतरला. कारचं चेकिंग झालं. “बॅग मध्ये काय आहे. उघडा ती.” – पोलिस. दिनेश नि बॅग उघडली. “आता डिकी उघडा. डिकी उघडल्या गेली.” – पोलिस. दिकी उघडल्यावर पोलिसांनी जे पाहिलं त्यांनी ते हादरून गेले. हे दृश्य त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यांनी ताबडतोब आवाज दिला. “साहेब, लवकर इकडे या. डिकीत लाश आहे.”

Full Novel

1

डिकीतला सस्पेन्स - भाग १

डिकीतला सस्पेन्स भाग १ रात्रीचे अकरा वाजले होते. लातूर सोलापूर मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा होता, आणि एका लाल रंगाच्या कार मध्ये कॅश घेऊन चालले आहेत अशी खबर होती. आता पर्यन्त पांच कार चेक करून झाल्या होत्या. रहदारी चालूच होती पण लाल कार नव्हती त्यामुळे पोलिस जरा आळसावून बसले होते. अशातच एक लाल कार येतांना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. “साहेब, कार चेक करायची आहे. आपण जरा बाहेर येता का ?” – पोलिस. “का काय झालं ?” दिनेश ने विचारलं. “चेकिंग होऊ द्या मग सांगतो आम्ही.” – पोलिस. “ओके. करा चेक.” – दिनेश म्हणाला आणि गाडीतून ...Read More

2

डिकीतला सस्पेन्स - भाग २

डिकीतला सस्पेन्स भाग २ भाग १ वरून पुढे वाचा .......... “गुड.” धनशेखर म्हणाले. मुलीची ओळख पटल्यामुळे त्यांना जरा समाधान आता शोध घेणं सोपं होणार होतं. “सर्विस प्रोवायडरला लोकेशन विचारा. बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन.” दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला. आणि लगेच पोलिस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली. साठे साहेब दुपारी आले. आल्यावर धनशेखरांनी विचारपूस सुरू केली. “साहेब, तुम्ही दिनेश घारपुरे यांना ओळखता ?” – धनशेखर “हो, माझा मित्र आहे, आणि तो लग्नाला येणार होता, पण बहुधा गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असावा म्हणून येऊ शकला नाही, असं वाटतंय. पण तुम्ही हे का विचारता आहात ? ...Read More

3

डिकीतला सस्पेन्स - भाग ३

डिकीतला सस्पेन्स भाग ३ भाग २ वरून पुढे वाचा ......... सांगोळे काशीनाथला घेऊन आला. “काशीनाथ तू हरीष ओळखतो. ?” – शेंडे. “हो. साहेब.” – काशीनाथ. “तो कुठे आहे ?” – शेंडे. “काय झालं साहेब ? काय केल त्यांनी ?” – काशीनाथ. “फालतू प्रश्न विचारू नकोस. तो कुठे आहे ते सांग.” शेंडे साहेबांनी कडक स्वरात विचारलं. “गोंदियाला गेला आहे साहेब. त्याचं घर आहे गोंदियाला.” – काशीनाथ. “कशाकरता गेला आहे ?” – शेंडे. “त्याचं लग्न ठरलं आहे अस म्हणत होता साहेब.” काशीनाथ. “कोणाशी ? आणि केंव्हा आहे लग्न ?” शेंडे. “कोणाशी ते नाही सांगितलं. गुपित आहे म्हणत होता.” ...Read More

4

डिकीतला सस्पेन्स - भाग ४ (अंतिम)

डिकीतला सस्पेन्स भाग ४ (अंतिम) भाग ३ वरून पुढे वाचा ......... पोलिस स्टेशन मधे रामभरोसे आणि त्याचा दोस्त आणल्यावर, अर्धा तास त्यांना तसंच बसवून ठेवलं. त्या लोकांची सारखी चुळबुळ चालली होती.अधून मधून त्यांच्याकडे कटाक्ष टाकत होते, सांगोळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होते. त्यामुळे रामभरोसेची अस्वस्थता आणखीनच वाढत होती. अगदी हलक्या स्वरात ते एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगोळे टिपत होता. अर्धा तास झाल्यावर रामभरोसेचा संयम सुटत आला होता. तो सांगोळेला म्हणाला “और कितनी देर हमे बिठाके रखेंगे ये तो बता दो. अरे साब हमने कुछ नहीं किया हैं. क्यूँ सता रहे हो ?” ...Read More