पाहिले न मी तुला

(15)
  • 26.9k
  • 5
  • 12.7k

आज 'प्रेम' या विषयावरची हि कथा तुमच्यासाठी.. या कथेचे नायक नायिका आहेत पियुष आणि प्रिया ! एक सुप्रसिद्ध कॉलेज.. त्यातील गमतीजमती.. दिल दोस्ती दुनियादारी..कॉलेजमधला एक मोठा इव्हेंट आणि त्यातले अफलातून किस्से..पियुष आणि प्रिया यांची एक अबोल प्रेम कथा.. सोबत मालवणी आगरी भाषेचा फ्लेवर..आणि बरच काही.. तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.

Full Novel

1

पाहिले न मी तुला - 1

१ नवे सेमिस्टर"बदलून गेलया सारं... पिरतीचं सुटलया वारं... आल्लड भांबावलया बिल्लोरी पाखरु न्यारं... आलं मनातलं या वटामंदी..." श्या.. फालतू पियुष ने पटकन गाण बदललं. हम्म... आत्ता कसं "सो बेबी पूल मी क्लोज़र, इन दी बैक सीट ऑफ़ योर रोवर" काय ही इंग्लिश गाणी, प्रिया मनातल्या मनात पुटपुटत होती. अस म्हणत तिने गाण बंद केल. "चला माणगाव उतरणारे", कंडक्टर ची हाक आली. गाडी पंधरा मिनिटे नाष्टयाला थांबली. प्रिया गाडीतून उतरली. वातावरणात थोडी थंडी होती. झाडांना नुकतीच पालवी फुटलेली. वसंत ऋतू नुकताच बहरलेला. पियुष खेडेकर चिपळुणचा राहणारा. कॉलेजनिमित्त तो महाडला आत्याकडे राहत होता. एक सेमिस्टर संपल्याने तो सुट्टी संपून पुन्हा कॉलेजला ...Read More

2

पाहिले न मी तुला - 2

४ नेने करंडकआज नेने कॉलेजला एक महत्त्वाचा दिवस होता. दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवण्याचा मोठा कार्यक्रम असायचा- नेने करंडक! यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ठरविक ग्रुप केले जात. नेनेच्या वेगवेगळ्या वर्गातल्या टॅलेंटेड मुलांनी नाव देऊन टाकली. आज यादी जाहीर होणार होती. प्रिया आणि अनु अगदी नऊच्या काट्यावर कॉलेजच्या एलसीडीच्या इथे येऊन पोहोचले. त्याच्या आधीच सर्व जण येऊन पोहोचले होते. सगळे एलसीडीकडे डोळे लावून बसले काऊंट डाऊन झाला ३.. २.. १.. ओह नो.. ग्रुपची नावं बघून सर्व चकित झाले. यावेळी नियम बदलला होता. सगळे डिपार्टमेंट मिक्स केले होते आणि सर्व गुण लक्षात घेऊन ग्रुप पाडले होते. चार जणांचे दोन गट पडले होते. कवितासुद्धा ...Read More

3

पाहिले न मी तुला - 3

७ रायगड प्रदक्षिणा १ फेब्रुवारी चा दिवस उजाडला. आज पहिलं काम जाहीर होणार होतं. सगळे गट वेळेवर एलसीडी च्या हजर झाले. रिंगटोन वाजली आणि समोर मेसेज आला.. पहिले टास्क 'रायगड प्रदक्षिणा' दिनांक १९ फेब्रुवारी. सगळ्यांनी एकमेकांकडे भुवया वर करून बघितलं. कारण दर वर्षी एखाद्या जवळपासच्या गावात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड असे सोपे उपक्रम असायचे .पण या वेळेस जरा वेगळंच होतं. मुलांची परीक्षा जवळ आल्याने मध्ये काही दिवसांचा गॅप ठेवला होता. जो गट प्रदक्षिणा सर्वात आधी पूर्ण करेल तो गट पहिल्या फेरीचा विजेता होणार होता. पहाटे चार वाजता रायगड प्रदक्षिणेला सुरुवात होणार होती. शिवाय १९ फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती किल्ले रायगडावर ...Read More

4

पाहिले न मी तुला - 4

१० चोरी चोरी चुपके चुपकेबरेच दिवसानंतर आज सगळ्यांना मोकळा वेळ मिळाला. "चल यार पियुष लय बोर झालंय" साहिल म्हणाला रे पियुष स्पर्धेच्या नादातून कितीतरी दिवसातना आज मोकळा वेळ मिळालाय" "कुठे यायचं बोल""कॅफेत जाऊ रिप अन् डीप" "ओके चल मग"दोघेही चालत चालत रिप अन् डीप कॅफेच्या दिशेने निघाले ..दोघे आत गेले.आणि समोर बघतात तर काय.. समोरचे दृश्य थक्क करणारे होते.त्यांच्यासमोर कविता आणि कबीर दोघेजण कॉफी पीत बसले होते. पियुष आणि साहिलला बघताच त्यांचा थरकाप उडाला आणि दोघेही उभे राहिले. कवितांच्या चेहऱ्यावरची रिअॅक्शन तर पाहण्यासारखी होती. आपल्या बॉयफ्रेंडसोबत कुणी मित्रांनी पकडल्यावर काय रिअक्शन असते हे ज्यांना अनुभव आहे त्यांनाच माहिती.. त्यात ...Read More

5

पाहिले न मी तुला - 5 - अंतिम भाग

१३ एक ईमेलअनुला थांबवत अक्षय बोलू लागला.. त्याने आज त्याच्या मनातल्या सगळ्या भावना तिला सांगून टाकल्या. अनु काहीही न निघून गेली .दुसऱ्या दिवशी त्याच्याजवळ येऊन ती म्हणाली" तुला सगळे माझ्या नावाने चिडवतात म्हणून तुला असं वाटलं असेल. पण तसं काही नाही आपल्या दोघांत काहीच रिलेशन नाही. ना तू मला आवडतोस आणि मी तुला आवडत नाही असं समज.. " एका दमात ती सर्व बोलून एका सेकंदात बस स्टॉप वरून नाहीसी झाली. सगळं संपून ती आज थोडं हलकं फील करत होती . अक्षयने ह्यावर खूप विचार केला. शेवटी आपलीच चूक म्हणून आपल्या सर्व भावना दफन केल्या आणि मेलबॉक्स उघडला कारण ती ...Read More