एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची पाऊल चढायची, अन ओसरली कि, सूर्य उगवल्यासारखी टाच उघडी टाकत तळव्याखालून वाळू ओढून न्यायची... कित्येक वर्ष ते स्वप्न मी पाहिलंय.. पण.. कधी? ती सोबत असताना.. तिने टाकलं मला तेव्हा.. तेव्हा माझ्या आयुष्यातून बाहेर पडलं ते पाऊल.. आता स्वप्नात फक्त रेतीवरचा खोल ठसा येतो.. पण तो ठसा जातानाचा दिसतोय.. परतीचा नाही.. मी वाट पाहतोय आता.. तो परतीच
कोंदण पर्व एक - भाग 2
सुनी तशी जगन्मित्र होती. तिच्या खूप मैत्रिणी होत्या. ती त्यांची लीडर असल्यासारखीचं वावरायची. सगळ्या तिच्या मागे मागे. त्यावेळी मुलींना वैगरे असण्याचा प्रकार तसा अपवादात्मक असायचा. मी सुनीच्या आयुष्यातला अपवाद होतो. ती माझ्याशी तितकीच मोकळी असायची जितकी एखाद्या मैत्रिणीशी. त्याचं कारण म्हणजे मला असं वाटत होतं कि, मी तिचं सगळं ऐकायचो. स्वतःची बुद्धी स्वतःसाठी फार न वापरता. तीने सांगितलेलं करण्यात खर्ची घालायचो.शिवाय घराजवळ रहात असल्यामुळे अगदी बालवाडीपासूनच आम्ही एकत्र होतो. पण मोठे होत चाललो तरीही आमच्यातल्या लिंगभेदाने आमच्या मैत्रीत कधीही दुरावा आणला नाही. उलटं तो बंध एकमेकांच्या संगतीमुळे आणखी दृढ होत गेला.त्या वर्षी सातवीच्या परीक्षा संपून निकाल लागला. मला आठ्याहत्तर ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 3
राम: रामौ रामा: प्रथमारामन रामौ रामान द्वितीया...अशा तर्हेने आमचं संस्कृत अध्ययन सुरु झालं. ती सुभाषिते पाठ करने, रूपं चालवणे. परस्मैपद, उभयपद यातली अंतरे. त्या सुंदर भाषेच व्याकरण बारिकशा क्लिष्ट अशा नक्षीत घडवलेल्या दागिण्यासारखेच क्लिष्ट होते. ते पुस्तक नुसतंच वाचणं म्हणजे सुद्धा जिभेला कवायत होती. तिथं पाठांतर वैगरे डोक्याला ताप होत होता. आणि संस्कृतला पाठांतरशिवाय पर्याय नाही हे माहित होतं. हौसेच रूपांतर जराशा त्रासात झालेलं मी पहिल्यांदा अनुभवत होतो. मला त्याची भीतीच वाटू लागली पहिल्यांदा.मग नेहमीप्रमाणे मी सुनीशी या विषयावर बोललो." सुने संस्कृत घेतलं तर खरं. पण एवढी सोपी, खायची गोष्ट वाटत नाहीये ग. कायच्या काय नियम आहेत त्यां भाषेला. ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 4
" परत असला प्रकार घडला तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल. हुशार आणि गुणी मुलगी म्हणून नाव आहे तुमच्या तिने असं वागावं असं अपेक्षित नाहीये. त्या मुलाच्या आई वडिलांना झाला प्रकार व्यवस्थितपणे सांगितला आहेच आम्ही. पण तुम्ही सुनेत्राला देखील समजावून सांगा. परत हे क्षम्य नसेल. " प्राचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये माझे वडील आणि सुनीचे वडील आमच्यासमोर उभे राहून प्राचाऱ्यांची बोलणी खात होते.पहिल्यांदाच तक्रार ऐकण्यासाठी तिच्या बाबांना बोलवण्यात आलं होतं. कारणं सुनीने प्रकारच असा केला होता. तिच्याकडून अशी कृती माझ्या कल्पनेपलीकडची होती... शिवाय.. ते तिने केलं त्याला कारण मी होतो... सुनीने क्षणात माझ्या मनातल्या भीतीचे निराकरण केले होते. माझ्या इतकं महत्वाचं तीला ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 5
"सुनेत्रा!"ट्युशनवरून येताना एक मुलाचा आवाज मागून आला. सुनी आणि मी वळलो. मला विश्वासच बसेना. तो सचिन होता." हं!? " एवढाच उच्चार निघाला."जरा काम होतं." तो म्हणाला. माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तो पूर्णपणे तिच्याकडेच बघत होता." माझ्याकडे? काय? " सुनी शांत स्वरात बोलली." संस्कृतच्या क्लासला जातेस ना तू? मला नाही जायला मिळत. कामे असतात इतर घरातली .. तर.. मला रविवारच्या दिवशी अभ्यासासाठी तुझी क्लासची वही मिळेल का? इतर कोणाची घेतली असती पण तू वर्गात पाहिली असतेस.. म्हणून तूला विचारलं. जमेल का?" एका खेपेत तो म्हणाला."देऊ शकते.. पण परत मला सोमवारी सकाळी वर्गात परत हवी." ती म्हणाली. तिने चक्क होकार दिला ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 6
क्लास सुटला होता. मी आणि सुनी चालत थोडंच पुढं आलो तसं आम्हाला नेहमीची त्या सचिनच्या सायकलीची खडखड ऐकू आली." सुनी माझ्याकडे बघत हसत म्हणाली." एकदम वेळेवर हा सचिन!! अजिबात चुकत नाहीस तू!" सुनी म्हणाली.तो जवळ येऊन थांबला. सुनीने ने तिच्या बॅग मधून वही काढली आणि त्याच्यासमोर धरली." thanks गं.. तुझ्यामुळे खूप सोपं झालंय मला हे सगळं. " तो म्हणाला. त्याने वही घेण्यासाठी हात पुढे केलाच होता.तेवढ्यात मला काही सुचलं.. अचानक..."मी आज काहीच लिहीलं नाहीये क्लास मध्ये. सुने तुझी वही हवीये मला आज." छातीतल्या वाढलेल्या धडधडीला दुर्लक्षित करत मी त्या दोघांच्यात निर्लज्ज होत नाक खुपसलं.दोघे चमकून माझ्याकडे बघू लागले. मग ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 7
सदावर्ते विद्यालयाच्या प्राथमिक विभागासमोर छोट्या व्हरांड्यात मला सुनी दिसली होती. बालवाडीचा पहिलाच दिवस आणि माझी आई मला शाळेत घेऊन समोर पाहतोय तर अंगणात खेळत दिवस काढलेले आम्ही बालमित्र मैत्रीण एकाच शाळेत असण्याचा उलगडा मला झालेला.मी खुश होऊन ओरडलो होतो."थुनी..!! ""जालू..ss!!" तिने मला बघताच तिचे डोळे चमकले आणि तीही हसून टाळ्या पिटत आनंदाने ओरडली.आम्ही दोघांनी धावत येऊन एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. आमच्या आया आमच्याकडे पाहून खूप हसत होत्या. वर्ग सुरु झाला. एवढं स्पष्ट आठवत नाही आता, मात्र काही वेळाने सुनी मला खिडकीच्या गजात तोंड खुपसून उभी असलेली दिसली. जवळ जाऊन बघितलं तर डोळे मिटून रडत होती. गालावरचे ओघळ तिच्या ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 8
गणपतीनंतर शाळेत चाचणी परीक्षेचे वातावरण होते. त्यामुळे सचिन आणि त्याच्या ग्रुपने तशी शांतताच ठेवली होती. मी पण त्यांच्याशी अंतर होतो. सचिन सुनी आधीसारखेच थोडं थोडं बोलत होते. पण मला माहित होतं. हा सचिन नक्कीच काही ना काही करणार.चाचणी परीक्षा उरकल्या होत्या. यावेळी मी तीन विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पाडले होते. गुणांमध्ये सुनीच्या अगदी जवळ येऊन ठेपलो होतो. माझी अजिबात तिच्याशी शर्यत नव्हती. पण ती मला म्हणाली होती. तू खूप मोठा होशील. तीला जर तशी अपेक्षाच आहे तर मग, मी माझ्या क्षमतांचा विकास करायला हवा असं मला वाटू लागलं. मग कंटाळ्याची धूळ झटकत मी माझ्या सुस्त मेंदूला थोडीच चालना दिली ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 9
सहामाही परीक्षा येऊ घातल्या होत्या. सुनी आणि मी अभ्यासाला लागलो होतो. Time table मिळाले तसे सुनी आणि मी गडप दोघे आपल्या आपल्या घरी अभ्यासात बुडालो. ह्यावेळी माझा आलेख मला चढता ठेवायचा होता. त्यामुळे मी शाळेतून आलो कि अभ्यासात असायचो.. सुनी आणि माझी धावती भेट व्हायची.तिने मला सांगून ठेवलं होतं."जाडू मन लावून अभ्यास कर हा.. यावेळी आणखी पुढे यायला हवाय तू."बस एवढं प्रोत्साहन मला पुरे होतं. बीजगणित आणि भूमिती दोघे माझे मित्र झाले होते तर, इंग्लिश माझं विना अभ्यास चांगलं होतं. व्याकरण करुन गेलं कि पुरे व्हायचं. विज्ञान आणि समाजशास्त्र सोबती होते.. कारण नुसतीच वर्तमानपत्र नाही तर वैज्ञानिक मासिके.. जगाच्या ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 10
सुनीचे आईबाबा संध्याकाळी घरी आले होते. काकूंनी मला जवळ घेत माझं खूप कौतुक केलं." मला तुझ्याबद्दल जे वाटत होतं अगदी तसाच आहेस. नेहमी अपेक्षाना खरा उतरतोस तू.. आपल्या या गुणी पोरांना दृष्ट लागायला नको कोणाची." माझ्यावर मायेची उधळण करत त्या म्हणाल्या.सुनीचं पण माझ्या आईबाबांनी कौतुक केलं. माझ्या पाठीशी नेहमी असण्याबद्दल आधीच त्यांना तिचं कौतुक होतं. तिचा माझ्यावरचा जीव माझ्या आईबाबांना चांगलाच माहित होता.बाबांनी मला त्याचवेळी surprize दिलं. नवी कोरी त्याकाळी खूप फेमस असणारी "hercules MTB Canon barrel" cycle दुकान वाल्याने आमच्या घरी आणली. मी त्यांना मागितली नव्हती. मी म्हणालो पण तसं त्यांना.पण बाबा म्हणाले, " तू मागत काहीच नाहीस. ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 11
शाळेत येताना रामदास भेटला. सायकल चालवत बोलत आम्ही येत होतो." यार तू भाषणकार आहेस खरंच. काय बोललास रे तू. वाटत नव्हतं आठवीतला आहेस. या वर्षी दोनदा प्राचाऱ्यांची शाबासकी मिळवलीस तू. खतरनाक. " तो म्हणाला." अरे एवढं काही नाही. थोडी डेरिंग केली की सगळं जमतं. तू पण करू शकतोस." मी म्हणालो." नाही पण सगळ्यांना सगळं जमतच असं नाहीये. तूझ्याकडे ते आहे बाबा. मी करूच शकेन असं नाहीये. " रामदास म्हणाला." का चांगला हुशार आहेस की, इतकी वर्षे नंबर काढतोयस ते का कमीये? " मी त्याला म्हणालो." अरे पण तू कुठे होता इतके दिवस?? असं बघ... त्या स्पर्धेला खूप मुलांचे आईवडील ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 12
स्फूर्ती"जे आपल्याला करता येत नाही, ते करायला पडणारे प्रयत्न आपले खरे शत्रू असतात, असं मला वाटायला लागलं होतं."गड किल्ले वैगरे माझ्याच्यानी त्यावेळी फारसं झालं नव्हतं. माझं खेळणं पण माझं यथातथाच होतं. शिवनेरीचं चढणं तसं फार काही अवघड नव्हतंच. पण ती चढाची वाट, माझी वाट लावायला पुरे होती. अतिरिक्त वजनामुळे माझा श्वास सारखा फुलत होता. गडाचा अर्धाच भाग चढून झाला होता. शेवटी शेवटी तर मला अगदीच नको झालं.मग मी आमच्या PT च्या सरांना विनंती करुन जिथे होतो तिथेच थांबलो. आमच्या सोबत आलेले एक उप- प्राचार्य त्यांनाही पुढं पुढं श्वसनाचा त्रास होऊ लागला. मग मी आणि ते तिथंच बसलो. सगळे निघून ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 13
यत्नस्वतःची सुस्तावस्था सोडून काही करायला जाणं हे किती कठीण काम आहे याचा प्रत्यय मला यायचा होता.मी मनावर तर घेतलं सुस्तता सोडून आता मी सकाळी लवकर उठून पळायला जाणार होतो. असं ठरवलंही होतं. पण...मी सकाळी उठून खिडकी बाहेर डोकवायचो. बाहेरचा अंधार आणि थन्डी ही प्रतिकूल परिस्थिती बघायचो. घरातली उब बघता परत अंथरून जवळ करायचो. सगळं स्फूरण मातीत जाऊ लागलं होतं. मग दिवसभर चुटपुट लागून रहायची. त्या स्थितीत आठवडा वाया गेला.सुनी आली होती घरी त्यादिवशी संध्याकाळी." जाडू..!! मी लाठी काठी संपूर्ण शिकले. आता मला गुरुजींनी फक्त प्रॅक्टिस करायला सांगितलंय. लाठी मारता येते, अडकवता येते आणि बचाव पण करता येतो.. टॉईंग कण ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 14
द्वेष" तुझ्यात जरासा बदल झाल्यासारखा दिसतोय हल्ली. " रामदास म्हणत होता." अरे आपलं वय वाढीच आहे. बदल तर होणारच " मी म्हणालो." नाही.. तू काहीतरी करतोयस. धडपड कसलीतरी.. वजन उतरल्यासारखं वाटतंय तुझं जरा. पण जे काही असेल चांगलं आहे." तो म्हणाला." सतत असं राहायचा कंटाळा आलाय मला आता. म्हणून चालू आहे थोडंफार, बाकी काही नाही. " मी म्हणालो. मला माझं" भारी रे. कर कर.. सगळीकडून सुधारणा करत आहेस हे मस्तच. " तो म्हणाला.असं संभाषण मला रामदास कडून मिळालं.पल्लवी पण म्हणाली. "जरा रोडावलायस. आजारी होतास की काय? "आणखी एक दोन जणं सुद्धा बोलले. म्हणजे बदल घडत होता. प्रयत्न दिसू लागले ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 15
उजेडदुखणं.. मग ते कुठलंही असू द्या.राग.. मग तो कशाचाही असू द्या..आपल्या मानसिक पडझडीला हे कारणीभूत असतात.मला ती होऊ द्यायची शांत होत आलो तसं माझं विचारचक्र सुरु झालं. सुनीला त्याने गुलाब दिलाय.. किंवा आणखी काही. आपल्याला काय? सुनी त्याला काय म्हणालीये कुठे माहित आहे आपल्याला?त्या सचिनने तीला थांबवण्यावरून काहीही गैरसमज करुन घेत लगेच इतकं टोकाचं वागणं चुकीचं आहे. शांतपणे आणि विचारीपणाने ही गोष्ट हाताळणे गरजेचे आहे.सुनिकडे पाहता ती तर स्थिर होती. नेहमीसारखंच तिचं वागणं होतं. मी विचारात पडलेला पाहून तीन माझ्याकडे बघत मला डोळ्यांनी "काय रे?" असं खुणावलं पण.. मी काही नाही.. अशा अर्थाने मान हलवली. तशी ती माझ्याकडे पाहून ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 16
"विरह""अरे बटणच सापडत नाहीत मला. F आणि J वर बोटे ठेवायची. पण मग जर बाकीची बटणं दिसलीच नाही तर न बघता कशी दाबायची?" पल्लवीचे निर्बुद्ध बडबडने गेले आठवडाभर मला सहन करावे लागत होते आणि पुढले तीन आठवडे पण तेच सहन करावं लागणार होतं.तिने पण कॉम्प्युटर चा क्लास जॉईन केला होता.आमचा गाव तसा बऱ्यापैकी बरा आधुनिक होता. सगळ्या सोई हळूहळू वाढत होत्या. कॉम्प्युटर क्लास उघडून दोन वर्षे झाली होती. मला interest होताच. पण मागल्या वर्षी उन्हाळ्यात नातेवाईकांमध्ये असणाऱ्या दोन जवळच्या लग्नामुळे पुढे ढकलला आणि या वर्षी लावून टाकला.पहिल्यादिवशी मी क्लास मध्ये आलो. सरांनी मला एका कॉम्प्युटरवर बसवले. त्यावेळी Ms Dos ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 17
"मिलाप"Results लागले. मी आणि सुनीने आमची पोजिशन जपली होती. सचिनचा मामा आला होता result घ्यायला. चेहऱ्यावरून आनंदी दिसला म्हणजे आणखी प्रगती केली होती. पल्लवी मला अभिनंदन करताना नको इतकी हसत होती. किंवा लाजत होती. मलाच कळेना काय ते.. सगळ्या शिक्षकांनी माझी पाठ थोपटली.सुनीच्या बाबांनी माझ्यासोबत येऊन तिचा result घेतला. घरी येताना पहिला आल्याबद्दल मला त्यांनी icecream खाऊ घातलं.आई बाबांना पुन्हा आनंदाच्या क्षणाचे भागीदार बनलेले बघताना मला आभाळं ठेंगणे झाले होते.Result नंतर एक आठवड्याने मी सुनीच्या दारात हजर झालो."काकू!! सुनी कुठंय?" मी म्हणालो."अरे!! ये.. किती वेगळा दिसलास एकदम, मी म्हणाले कोण आहे सुनी म्हणून विचारणारे? व्यायाम जोरात सुरु आहे वाटतं? ...Read More
कोंदण पर्व एक - भाग 18
स्फ़ोटशाळा भरली. माझा नववीचा नवा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. हवेशीर आणि प्रकाशित. मला जाम आवडला. मी बसायला मधल्या ओळीत बेंचवर होतो. सुनी माझ्या शेजारच्या ओळीत पहिल्या बाकावर बसली होती. सर्वच मुलांमध्ये खूप बदल झाले होते. उंची, रंग, आवाज जरा जरा बदलले होते.माझ्यातही झालाच होता. आता मी सुनीसाठीच जाडू होतो. इतरांसाठी नाही. सचिनला मी माझ्याकडे तीन चार वेळा निरखून बघताना पहिला होता. माझ्यात झालेला बदल त्याला अस्वस्थ करत होता असं मला वाटत होतं.सगळीकडून नंबरांची आणि मार्कांची चौकशीवजा बडबड होतं असल्यामुळे मला कळले की, तो यावेळी पहिल्या दहामध्ये आला होता. त्याची मेहनत दिसत होती. तो मधल्या सुट्टीत सुनीचं अभिनंदन करुन आला. ...Read More