गंधाळलेला पाऊस

(36)
  • 7.9k
  • 9
  • 1.8k

गंधाळलेला पाऊस         सारा भवताल नितळ सोनेरी किरणांनी झळाळून निघाला होता.त्याने धुक्याची जणू काही झिलईच पांघरली होती.उबदार दवांचे सुंदर प्रतिबिंब मनाच्या आरश्यात झिरपत होते.आभाळ विविध रंगानी सजलेले होते.हा श्रावण सोहळा पाहून  मन भरून ओसंडून वाहत होते.सारा परीसर हिरवाईने नटलेला, जशी डोंगरमाथ्याने हिरवी शालच पांघरावी.रिमझिम सरी जश्या बरसू लागल्या तसे या थेंबांच्या सुमधूर संगीताने सारी सृष्टीही डोलू लागली.                     मन आज जरा जास्तच  आनंदात डोलत  होते, कारण या निसर्गांच्या रंगाबरोबर ते अजून एका रंगात रंगले होते.'प्रेमाचा रंग' जो माझ्यावर चढला होता.आज माझ्यासोबत कुणीतरी होते.कुणीतरी आपले फक्त आपले.आणि ती व्यक्ती होती माझी