१.. गोवा- नयनरम्य समुद्र किनारा, अविस्मरणीय सूर्यास्त आणि बरंच काही..

(40)
  • 16.6k
  • 5
  • 6.6k

गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगीजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला.