ती उमलते एक एक पाकळी अलगद उमलावी जशी. खुलताना खुलते नाजूक कळी अशी. स्त्रीत्व काय असतं तिच्याशिवाय कोण बरे नीट सांगू शकेल. "एक स्टेफ्री सेक्यूर अल्ट्रा थीन...." मेडीकलमध्ये आॅर्डर दिली तश्या बाजूच्या दोघांच्या नजरा माझ्यावर आल्या. एक साधारण चाळीशीतला अन् दुसरा विशीतलाच. स्टोअरकीपरनं मला माझं 'गर्ल स्टफ' वर्तमानपत्राच्या कागदात व्यवस्थित पॅक करून दिलं. मी ते घेतलं पैसे दिले अन् निघायला वळते तर तो विशीतला मुलगा माझ्याकडे पाहून गालात हसला.. त्याची नजर माझ्यावरून फिरत माझ्या एका हातातल्या पॅक वर जाऊन पुन्हा हसत हसत माझ्याकडे आली. "दीडशहाणा.." मी ओठांतच पुटपुटले.. दुसर्या हाताने मी माझ्या ओढणीचं एक टोक तर्जनी आणि अंगठ्यामध्ये गोल फिरवत