अलवणी - ३

(103)
  • 43.3k
  • 8
  • 32.8k

मोहीत खाली कारमध्ये बसुन गाडी गाडी खेळत होता, आकाश बंगल्याचे दार उघडुन मोहीतशी खेळायला बाहेर आला आणि त्याने दार लावुन घेतले. खालचे दार लावण्याचा आवाज आला तसे शाल्मली आपल्या बेडवरुन उठली आणि सावकाश चालत चालत खिडकीपाशी गेली. तिने खिडकीचा पडदा बाजुला करुन खाली बघीतले. गाडीपाशी मोहीत आणि आकाश आप-आपसात खेळण्यात मग्न होते. शाल्मली सावकाश माघारी वळली तेंव्हा तिच्या चेहर्‍यावर एक क्रुर हास्य होते. तिच्या चेहर्‍यातला गोडवा केंव्हाच गायब झाला होता आणि त्या क्रुर हास्याने तिचा चेहरा अधीकच विद्रुप दिसत होता. तिची नजर कुठेतरी शुन्यात लागली होती, तरीही तिला समोरच्या वस्तु बरोबर दिसत होत्या. हळु हळु चालत ती ड्रेसिंगच्या टेबलापाशी गेली. तिने खण उघडला आणि स्वतःचे लाल रंगाचे लिपस्टीक बाहेर काढले.