अलवणी - ४

(77)
  • 47.2k
  • 13
  • 18.8k

जयंत बंगल्यावर पोहोचला तेंव्हा घड्याळात ३ वाजुन गेले होते. “वहिनी कश्या आहेत?”, जयंतने दारातुनच विचारले “शाल्मली ठिक आहे. ताप उतरला आहे तिचा, पण अजुनही अशक्तपणा आहे तिच्या अंगात”, जयंताला आतमध्ये घेत आकाश म्हणाला. जयंत आत आल्यावर आकाशने दार लावुन घेतले. “कसा झाला प्रवास?”, जयंताच्या हातातली बॅग घेत आकाश म्हणाला. “चल एकदा वहीनींना भेटुन घेतो, मग आपण सविस्तर बोलु”, आकाशचा प्रश्न टाळत जयंत म्हणाला. “बरं, चल वरच्या खोलीत आहे शाल्मली”, असं म्हणुन आकाश जिन्याकडे गेला, जयंतसुध्दा त्याच्यामागोमाग वरच्या खोलीत गेला शाल्मलीला नुकतीच झोप लागली होती. मोहीतला सुध्दा सकाळपासुन कुठेच बाहेर पडता आले नव्हते त्यामुळे तो सुध्दा कंटाळुन झोपुन गेला होता. दोघांना