पैंजण..

  • 12.1k
  • 2.5k

पैंजण.. ढग दाटून आले होते . हवेने गव्हाची पाती चांगलीच डुलत होती. ज्वारी, गहू, ऊसाच्या पात्यांचा सळसळणारा आवाज. तो उनाड वारा कधी मातीच्या ढेकळांना तर कधी पटातील पाण्याला स्पर्श करून पळत होता. सार शेत कस हिरवगार दिसत होत. नंदू सोयाबीन च्या बणीम वर, दोन्ही हातांची उशी बनवून, त्यावर डोक ठेवून, एक पाय गुडघ्यात वाकवून त्यावर दूसरा पाय ठेवून.. मस्त दाटलेल्या ढगांकडे बघत झोपला होता. मधूनच इकडे तिकडे करणारा पाखरांचा थवा बघून नंदू च्या चेहर्‍यावर हलकस समाधान दिसे तेवढ्यात त्याच्या कानावर घंटी आणि चंगाळ्याचा आवाज पडला. आवाज ऐकताच नंदू खुश झाला. नंदू त्याच आवाजाच्या दिशेने पाहत राहिला. दूरवर बांधावरून