अलवणी - ८

(47)
  • 22.5k
  • 6
  • 13.5k

शाल्मलीच्या अंगावर एक सरसरुन काटा आला. तिची नजर भिंतींच्या कोपर्‍यात काही दिसते आहे का ह्याचा शोध घेत होती. रामुकाकांच्या हातात मांजर बसणं अशक्य झालं तसं रामुकाकांनी मांजर खाली सोडुन दिले. ते मांजर धावत धावत स्वयंपाकघराच्या कोपर्‍यात गेले आणि तेथे मोठमोठ्यांदा गुरगुरु लागले. सर्वजणं धावतच त्या मांजराच्या मागे गेले आणि तेथे त्यांना एक भले मोठ्ठे दार दिसले. एका मोठ्ठ्या कुलुपाने आणि मोठ्ठ्या फळीने ते दार बंद केले होते. रामुकाकांनी एकवार सर्वांकडे पाहीले आणि मग ते म्हणाले, “संपूर्ण बंगल्याला कोठेही इतके मोठ्ठे दार किंवा इतक मोठठं कुलुप लावलेलं नाही, मग इथंच का? असं काय मौल्यवान वस्तु त्या तळघरात असणार आहे की जी सुरक्षीत रहावी म्हणुन इतका बंदोबस्त केला गेला असावा?”