अलवणी - १०

(42)
  • 20k
  • 8
  • 13k

जयंता वरच्या बेडरुममध्ये गेला. खोलीच्या खिडक्या बंद होत्या आणि पडदे लावून घेतल्याने खोलीत अंधार पसरला होता. जयंताने सावधानतेने खोलीत प्रवेश केला. त्याची नजर खोलीच्या अंतरंगात लागलेली होती. चाचपडत त्याने बटनांच्या दिशेने हात न्हेला आणि अचानक त्याला असे जाणवले कि त्याचा हात कोणीतरी घट्ट पकडला आहे. जयंताने झटका देऊन हात काढून घेतला. तो भास होता का खरंच कोणी त्याचा हात धरला होता ह्यावर त्याचे एकमत होईना. जयंता थोड्यावेळ तेथेच अंदाज घेत उभा राहिला. परंतु खोलीतून कसल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता. धडधडत्या अंतकरणाने जयंता खोलीच्या आत गेला आणि त्याने दिव्याचे बटन दाबले. क्षणार्धात खोलीचे अंतरंग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाले. जयंताने खोलीतून सर्वत्र नजर फिरवली. त्याच्या नजरेस दिसेल असे तेरी कोणीही त्या खोलीत नव्हते. जयंताने भिंतींच्या टोकाला असलेल्या कोपर्यांकडे बघितले.