मुळशी पॅटर्न ? - एका तालुक्याची नाही तर आख्ख्या देशाची गोष्ट?? - म

(40)
  • 8.4k
  • 7
  • 2.5k

गावचे पाटील व एकेकाळचे महाराष्ट्र केसरी असलेले सखा पाटील(मोहन जोशी) यांना थोडीफार आर्थिक रक्कम देऊन, धमकी देऊन त्यांच्याकडून जमीन हिसकावली गेली. एकेकाळचे पाटील पण संसार चालवण्यासाठी त्यांच्यावर वॉचमन व्हायची नामुष्की आली. यामुळे राहुल (ओम भुतकर) व त्यांच्यात अधूनमधून वारंवार खटके उडायला लागले. कालांतराने त्यांना आपले राहते घरही सोडावे लागले. मग संपूर्ण कुटुंबासह ते पुण्याला आले व राहुल व ते हमालाचे काम करू लागले. तेथे हमालांची होणारी पिळवणूक पाहून राहुल्याचा मनात रागाची भावना निर्माण होत होती. तेथूनच त्याच्या भावनांचा उद्रेक होतो. व पुढे त्याचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध येतो. गुन्हेगारी जगतातील एका मोठ्या टोळीला तो सामील होतो. अनेक जणांना धमकावून जमीनी बळावतो.