इश्क – (भाग ५)

(28)
  • 10.2k
  • 1
  • 4k

“आई-शप्पथssss.. सौल्लीड शॉक बसला असेल ना तुला?”, रोहन फोनवर खो-खो हसत म्हणाला“अरे मग काय तर.. दुसरं कोणी असतं तर थोबाडच लाल केलं असतं.. पण यार खरंच, इतकी मस्त आहे ना राधा….”, कबिर “बsssर.. चांगली प्रगती आहे, दोन दिवस नाही झाले गोव्याला जाऊन तर..करा एन्जॉय करा.. आणि हो स्टोरी घे लिहायला …”, रोहन“हो रे.. सुचायला तर हवं काही तरी…”, कबिर “अरे अख्खी कादंबरी आहे तुझ्याजवळ.. मला नक्की खात्री आहे, तुझी गोष्ट तुला राधामध्येच मिळेल…”, रोहन“लेट्स सी.. बरं चल, ठेवतो.. करेन फोन नंतर…”, कबिर“येस्स सर.. बरं यार, एक फोटो पाठव नं त्या राधाचा.. तु इतकं छान वर्णन केलं आहेस.. फ़ार बघायची इच्छा