भुताची वाट रहस्यमय भयकथा

  • 16.2k
  • 4.1k

    असं म्हणतात हा रस्ता खूप सुनसान आहे .  या रस्त्यावरती म्हणे रात्रीची भुते फिरतात . बरेच चकवे आहेत म्हणे या रस्त्यावर .  मला बिलकुल विश्वास नाही असल्या भुताखेतांच्या गोष्टीवर . म्हणूनच माझी मित्रांबरोबर पैज लागली. मी म्हटलं या रस्त्यावरून मी जाऊन दाखवणार व व्हिडिओ शूटिंग काढून तुम्हा सर्वांना आणून दाखवणार. मग ठरल्याप्रमाणे त्या अमावस्येच्या रात्री मी माझी मोटार बाईक काढून निघालो. मित्र म्हणत होते अरे बाबा एखाद्या देवाचा फोटो किंवा अंगारा वगैरे घेऊन जा , पण असल्या या अंधविश्वासू गोष्टींवरती माझा मुळीच विश्वास नाही .  मी नेहमी या अंधश्रद्धांच्या विरोधात बोलत आलेलो आहे . त्यामुळे मी असल्या अंधश्रद्धा